तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर ही बातमी नक्की वाचा. PF च्या नियमासंदर्भात ही बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सदस्यांचे प्रोफाइल अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन दुरुस्तीनुसार, EPFO सदस्य कोणतेही दस्तऐवज अपलोड न करता आपला आधार-लिंक्ड युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वैयक्तिक तपशीलांसह अपडेट करू शकतात.
UAN आधारशी लिंक असेल तर EPF सदस्य कोणतेही दस्तऐवज अपलोड न करता नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचे किंवा आईचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव, सामील होण्याची तारीख आणि सोडण्याची तारीख यासारख्या वैयक्तिक माहितीसह तुमचे प्रोफाइल अपडेट करू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इतर कागदपत्रांची गरज भासणार नाही.
यापूर्वी सदस्यांना प्रोफाइल अपडेट करण्यासाठी त्यांच्या नियोक्ताकडून (कंपनी) मंजुरी घ्यावी लागत होती, ज्यामुळे सरासरी 28 दिवस वेळ लागायचा. पण आता या बदलामुळे EPFO च्या वतीने सात कोटी सदस्यांना मदत होणार आहे.
EPFO ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये EPFO ला नियोक्त्यांद्वारे (कंपनी) दुरुस्तीसाठी प्राप्त झालेल्या एकूण 8 लाख विनंत्यांपैकी सुमारे 45 टक्के बदल नियोक्त्याची (कंपनीची) पडताळणी किंवा EPFO मध्ये मान्यता न घेता सदस्य स्वत: अपडेट करू शकतो.” कोणत्याही अपडेटला नियोक्त्यांच्या (कंपनी) मंजुरी आवश्यक असेल.
सदस्यांना कोणत्याही अपडेट किंवा पैसे काढण्यासाठी त्यांचे आधार आणि पॅन त्यांच्या EPF खात्याशी लिंक करावे लागेल. EPFO तपशील आणि आधारमध्ये कोणतीही चूक झाल्यास मंजुरीस उशीर होऊ शकतो. अशा समस्यांवर मात करण्यासाठी, नियोक्ता (कंपनी) आणि EPFO च्या मंजुरीच्या वेळेनुसार प्रक्रियेस काही आठवडे लागू शकतात.
UAN म्हणजे काय?
UAN हा 12 अंकी क्रमांक आहे जो PF खात्यांवर लक्ष ठेवण्यास मदत करतो. PF खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आणि इतर कोणत्याही बदलांसाठी UAN आवश्यक आहे. एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ELI) योजनेचा लाभ घेण्यासाठी UAN अॅक्टिव्हेशन आणि बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे.
EPF प्रोफाइल अपडेट कसे करावे?
EPF www.epfindia.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवरील पोर्टलला भेट द्या.
UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा सारखे तपशील टाकून सदस्य पोर्टलवर लॉग इन करा.
मेनूच्या शीर्षस्थानी ‘मॅनेज’ पर्याय निवडा.
आता सदस्यांना ‘मॉडिफाई बेसिक डिटेल्स’चा पर्याय निवडावा लागणार आहे.
आधार कार्डनुसार आपली वैयक्तिक माहिती भरा आणि सबमिट करा.
लॉस्टमध्ये ‘ट्रॅक रिक्वेस्ट’ या पर्यायाचा वापर करून तुम्ही प्रोफाईल अपडेट प्रक्रिया ट्रॅक करू शकता.