Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रसिंधुदुर्गच्या समुद्रात सापडला नवा तेलसाठा; उत्पादन 4 पटीने वाढणार

सिंधुदुर्गच्या समुद्रात सापडला नवा तेलसाठा; उत्पादन 4 पटीने वाढणार

महाराष्ट्रातील कोकण क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. तळ कोकणाजवळील अरबी समुद्रात नवे खनिज तेल साठे सापडल्याची माहिती मिळाली आहे. कोकणातील पालघर अन सिंधुदुर्गमध्ये हे मोठे तेल साठे सापडले असल्यामुळे भारतातील तेल साठा अजून भक्कम होण्यास मदत मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या संशोधन करून या ठिकाणावरील उत्खनन करणार आहेत. अन आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

 

कोकणात सापडले नवीन तेलसाठे –

पालघर अन सिंधुदुर्गच्या समुद्राच्या खोल पाण्यात सुमारे 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळात हे तेलसाठे शोधले गेले आहेत. बॉम्बेहाय नावाने ओळखला जाणारा साठा 1974 मध्ये मुंबईच्या समुद्रात सापडला , हा तेल साठा आजही उत्खननासाठी महत्त्वाचा आहे, आणि त्यानंतर 2017 मध्ये देखील तेल साठे सापडले होते. मात्र या वेळीस सापडलेला हा मोठा तेल साठा इतर साठ्यांच्या तुलनेत जास्त मोठा असल्याचे दिसून येते.

 

तेल उत्पादन चार पटीने वाढणार ? –

आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठयामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे.

 

उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार –

डहाणूच्या समुद्रात 5, 338.. 03 आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात 19 हजार 131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे. कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अन आशा आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -