Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रCBSE चा निर्णय ! आता 35% नाही, इंग्रजी विषयात पास होण्यासाठी इतक्या...

CBSE चा निर्णय ! आता 35% नाही, इंग्रजी विषयात पास होण्यासाठी इतक्या टक्क्यांची आवश्यकता

तुमचे पाल्य देखील १२ वी ची परीक्षा देत असेल तर विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची बातमी आहे. सीबीएसई बोर्डतर्फे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इंग्रजी या विषयात पास होण्यासाठी आता 35% नाही तर 33% गुण आवश्यक असणार आहेत.

 

त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे, ११ मार्च २०२५ रोजी बारावी इंग्रजी विषयाची परीक्षा घेतली गेली आहे. दुपारी १:३० वाजेपर्यंत ही परीक्षा चालली.

 

सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक

 

१५ फेब्रुवारी २०२५ पासून बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात

१२ मार्च – योग आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी ट्रेनर विषयाची परीक्षा

१३ मार्च – वेब अप्लिकेशनचा पेपर

१४ मार्च – होळीची सुट्टी

१५ मार्च – हिंदी विषयाची परीक्षा

१७ मार्च – उर्दू, कथक नृत्य, फ्रंट ऑफिस ऑपरेशन यांसारख्या विषयांचे पेपर

०४ एप्रिल २०२५ – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचा पेपर

 

कोणत्या विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत?

 

CBSE बोर्डात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, कायद्याचे अध्ययन, व्यवसाय अध्ययन, व्यवसाय प्रशासन, भूगोल, कृषीशास्त्र, विपणन, अन्न उत्पादन, शारीरिक शिक्षण आणि फ्रेंच यांसह विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.

 

33% गुणांवर पासिंग

 

CBSE बोर्डाने जाहीर केलेल्या नवीन मार्किंग योजनेनुसार, इंग्रजी परीक्षेत पास होण्यासाठी आता फक्त 33% गुण आवश्यक असतील. यापूर्वी विद्यार्थ्यांना 35% गुण आवश्यक असत.

 

२०२६ पासून १० वीच्या परीक्षेतील बदल

 

CBSE बोर्डाने पुढील वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरी परीक्षा मे महिन्यात होईल.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्वोत्तम गुणांनाच ग्राह्य धरले जाईल.

विद्यार्थी आणि पालक अधिक माहितीसाठी CBSEच्या अधिकृत पोर्टलवर माहिती पाहू शकतात. नवीन नियमांनुसार अभ्यासाचे नियोजन करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -