जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे कोट्यवधी युजर्स आहेत. आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी जिओने आता एक जबरदस्त असा प्लान लॉन्च केला आहे.
जिओने क्रिकेट आणि एंटरटेन्मेंट प्रेमींसाठी एक खास प्लान लॉन्च केला आहे. गेल्या महिन्यात जिओने 195 रुपयांमध्ये सर्वात स्वस्त जिओ हॉटस्टार प्लान लॉन्च केला होता. पण कंपनीने आता जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणखी स्वस्त केले आहे. जिओने केवळ 100 रुपयांत नवीन डेटा पॅक लॉन्च केला आहे.
जिओचा 100 रुपयांच्या प्लानचे फायदे
जिओच्या या पॅकने रिचार्ज करुन युजर्स 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) चा आनंद घेऊ शकतात. या प्लानमध्ये युजर्सला 5GB डेटा सुद्धा मिळत आहे.
जिओच्या या डेटा प्लानमध्ये युजर्सला 90 दिवसांसाठी JioHotstar चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. या प्लानमध्ये मिळणाऱ्या जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शनचा वापर तुम्ही मोबाईल आणि टीव्ही या दोन्ही ठिकाणी करु शकता.
हे पण वाचा : Recharge Plan: 197 रुपयांच्या प्लानमध्ये 70 दिवसांची व्हॅलिडिटी; कॉलिंग आणि डेटा सुद्धा… पाहा 200 रुपयांपेक्षा स्वस्त आणि मस्त प्लान
हा एक डेटा पॅक आहे त्यामुळे याचा वापर करण्यासाठी तुमच्याकडे एखादा बेस प्लान असणे आवश्यक आहे. हा प्लान जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि डेटा या दोन्हीसाठी 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. कंपनीच्या मते, 5GB डेटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64kbps इतका होतो.
हा प्लान जिओ युजर्ससाठी वेब सीरिज, सिनेमा आणि लाईव्ह स्पोर्ट्स यासारख्या IPL 2025 पाहण्यासाठी बेस्ट आहे. स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही या दोन्हीवर तुम्ही 1080p रिझॉल्युशनपर्यंत स्ट्रीमिंगसह तुम्ही एंटरटेन्मेंट आणि स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. पण हा एक डेटा प्लान असल्याने त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत नाही.
हे पण वाचा : Jio Recharge: जिओच्या 47 कोटी युजर्सला मोठा झटका; आता ‘ही’ फ्री सुविधा बंद
जिओचा 195 रुपयांच्या प्लानचे फायदे
गेल्या महिन्यात जिओने 195 रुपयांत JioHotstar प्लान लॉन्च केला होता. जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला 15GB डेटा आणि 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानमध्ये जिओ हॉटस्टारचे फ्री मोबाईल सब्सक्रिप्शन मिळते. म्हणजेच या पॅकमध्ये युजर्सला केवळ मोबाईलवरच जिओ हॉटस्टार पाहण्याचा आनंद घेता येत होता.