Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रIT क्षेत्रात भरतीचा मोठा धडाका; भारतातील TOP 6 कंपन्या 82,000 फ्रेशर्स घेणार

IT क्षेत्रात भरतीचा मोठा धडाका; भारतातील TOP 6 कंपन्या 82,000 फ्रेशर्स घेणार

ज्यांना आयटी क्षेत्रात काम करायला आवडते, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या क्षेत्रात पुढील आर्थिक वर्ष म्हणजेच FY26 मध्ये मोठी भरती होणार असल्याचे सांगितले आहे. देशातील टॉप सहा आयटी कंपन्या तब्बल 82,000 फ्रेशर्स भरण्याचा विचार करत आहेत. त्याचसोबत यंदा एकूण 1.5 लाखांहून जास्त नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. खासकरून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाऊड कंप्यूटिंग आणि जनरेटिव्ह AI यांसारख्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आयटी कंपन्या आणि जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCs) मोठ्या प्रमाणावर नवीन लोकांना संधी देण्यास तयार आहेत.

 

उमेदवारांसाठी करिअरसाठी संधी निर्माण होणार –

आयटी क्षेत्रात पुढे येणाऱ्या AI, क्लाऊड आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सारख्या नव्या तंत्रज्ञानांमध्ये वेगाने वाढ होत आहे. कंपन्या यामध्ये जास्त गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध कौशल्यांमध्ये विशेष तज्ञांची मागणी वाढत आहे. विशेषतः जनरेटिव्ह AI, सायबर सिक्युरिटी, डेटा अनालिटिक्स आणि lot या क्षेत्रांमध्ये नवीन भरती होण्याची शक्यता आहे. यामुळे त्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी येरझार संधी निर्माण होणार आहेत.

 

पदवीधरांसाठी मोठी संधी –

 

आयटी क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून मंदीचे वातावरण होते, परंतु आता स्थिती सुधारत आहे आणि कंपन्यांकडून भरती वाढवण्याच्या दृष्टीने अधिक आशावादी दृष्टिकोन दिसत आहे. यामुळे, नवीनतम तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवीधरांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. विशेषतः AI आणि क्लाऊड तंत्रज्ञानात कौशल्य मिळवणाऱ्यांना चांगलया पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवाराना मोठा दिलासा मिळाला आहे. तांत्रिक शिक्षण हे भारताच्या औद्योगिक विकासासाठी, नोकरीच्या संधींसाठी, स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि नवोन्मेषासाठी अत्यावश्यक आहे. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे, पण तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना योग्य तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -