Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात 19 ते 22 मार्चदरम्यान पाऊस

राज्यात 19 ते 22 मार्चदरम्यान पाऊस

प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्याने संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होता आहे. राज्यात 19 ते 22 मार्च या चार दिवसांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

 

तर विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

 

यंदा उष्णतेच्या झळा संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पहिला पंधरवाडा असे एकूण 43 दिवस सुरू आहेत. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे आल्याने राज्यात ऊन, पाऊस अन् ढगाळ वातावरण असे चित्र 19 ते 22 मार्चदरम्यान दिसणार आहे.

 

हिमालयापासून ते काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशपर्यंत 18 ते 20 दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ढगाळ वातावरण अन् पाऊस सुरू झाला आहे. महाराष्ट्रात मात्र असे वातावरण 19 मार्चपासून सुरू होत आहे.

 

असे आहेत पावसाचे अलर्ट

 

– कोकण : (19 ते 22 मार्च) – मध्यम पाऊस

 

– मध्यमहाराष्ट्र : (19 ते 22 मार्च) – मध्यम पाऊस

 

– मराठवाडा : (19 ते 22 मार्च) – हलका पाऊस

 

– विदर्भ : (17 व 18 ) उष्णतेची लाट आणि (19 ते 22) दरम्यान हलका पाऊस

 

राज्याचे राज्याचे रविवारचे तापमान…

 

मुंबई 31, पुणे 38.2, चंद्रपूर 41.6, अकोला 40.5, अमरावती 40, बुलडाणा 37, गोंदिया 37.8, नागपूर 40.4, वर्धा 30.2, यवतमाळ 36.6. धाराशिव 38.6,छ.संभाजीनगर 37.5, परभणी 39.4, बीड 40.2, कोल्हापूर 37.8, लोहगाव 39.5, जळगाव 37.8, महाबळेश्वर 32.8, मालेगाव 39.2, नाशिक 36.1, सांगली 38.3, सातारा 38.2,सोलापूर 40.3.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -