Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रडंपर-दुचाकीच्या धडकेत दहावीची विद्यार्थिनी जागीच ठार; क्लासला जात असताना अपघात, दहावीचा शेवटचा...

डंपर-दुचाकीच्या धडकेत दहावीची विद्यार्थिनी जागीच ठार; क्लासला जात असताना अपघात, दहावीचा शेवटचा पेपर राहिला अधुरा..

मनस्वी ही पाट येथे एस. एल. देसाई विद्यालयात (S. L. Desai School) दहावीत शिकत होती. आज (ता. १७) दहावीचा शेवटचा पेपर असल्याने ती दुचाकीवरून पाट येथे क्लाससाठी येत होती.

 

म्हापण : डंपर आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा (10th Student) जागीच मृत्यू झाला.

 

मनस्वी सुरेश मेतर (वय १५, रा. निवती) असे तिचे नाव आहे. अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास पाट माऊली मंदिरनजीक (Pat Mauli Temple) घडली. याप्रकरणी अल्पवयीन दुचाकीस्वारासह त्याचे वडील, डंपर चालकाविरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मनस्वी ही पाट येथे एस. एल. देसाई विद्यालयात (S. L. Desai School) दहावीत शिकत होती. आज (ता. १७) दहावीचा शेवटचा पेपर असल्याने ती दुचाकीवरून पाट येथे क्लाससाठी येत होती. वाळू वाहतूक करणारा डंपर (एमएच ०७ बी ७८९१) परुळे-पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता.

 

पाट माऊली मंदिर येथील तीव्र वळणाचा अंदाज दुचाकीस्वाराला न आल्याने दुचाकीची डंपरला धडक बसली. यात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निवती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनास्थळी उपस्थितांकडून हळहळ व्यक्त होत होती.

 

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत निवती पोलिस ठाण्यात धडक दिली. परुळे, पाट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक होत असते. चालक सुसाट डंपर चालवत असतात, याकडे लक्ष वेधत भरधाव डंपर वाहतुकीला आळा घालण्याची मागणी पोलिसांकडे केली. दरम्यान, याप्रकरणातील अल्पवयीन दुचाकीस्वारासह त्याचे वडील, डंपर चालकाविरोधात निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -