Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रपतंजलीने आधी FMCG क्षेत्रात जम बसवला,आता या नव्या क्षेत्रात टाकतेय पाऊल

पतंजलीने आधी FMCG क्षेत्रात जम बसवला,आता या नव्या क्षेत्रात टाकतेय पाऊल

रामदेव बाबा यांच्या पंतजली कंपनीने अलिकडे विमा क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. मॅग्मा जनरल इंश्योरन्समध्ये पतंजलीने मोठी भागीदारी केली आहे. ही डील पूर्ण झाल्यानंतर कंपनी आता विमा फर्मची प्रमोटर बनली आहे. हा निर्णय पतंजलीच्या व्यवसायाचा पोर्टफोलियोला पुढे नेण्याच्या दिशेमध्ये मोठे पाऊल ठरल्याचे मानले जात आहे.

 

पतंजलीचा बिझनेस व्हीजन

पतंजलीने फास्ट मुव्हींग कंझ्युमर गुड्स ( FMCG क्षेत्र ) वरुन पुढे वाढत आता आपली रणनितीचा आणखी विस्तार केला आहे. आपल्या एफएमसीजी उत्पादनांमुळे प्रसिद्ध असलेल्या कंपनीने आपल्या मुख्य व्यवसायाच्या बाहेर पाऊल ठेवले आहे. विमा सारख्या वित्तीय सेवेत प्रवेश करणे आणि आपल्या ग्रुपच्या चार कंपन्यांना आयपीओच्या माध्यमातून लिस्टी करणे सौदर्य आणि व्यक्तीगत देखभाली सारख्या गैर खाद्य व्यवसायांवर लक्ष केंद्रीत करण्याकडे कंपनी चालली आहे.

 

पतंजली फूड्स

पतंजलीने शॅम्पू, साबण, फेस वॉश आणि लोशन सारख्या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादनाची एका साखळीसह सौदर्य आणि व्यक्तीगत देखभाल क्षेत्रात विस्तार केला आहे. पंतजलीने पारंपारिक व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आणि पोशाखा श्रृंखले अंतर्गत कुर्ता, पायजमा आणि जिन्स देखील सादर केल्या आहेत.

 

पतंजलीचा विस्तार कार्यक्रम

पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादन आणि स्वास्थ जीवनशैलीची वाढत्या मागणीला अनुरुप नैसर्गिक आणि हर्बल साहित्याची निर्मिती केली. पतंजली जवळ वितरणाची मोठी मजबूत साखळी आहे. जी ग्रामीण आणि शहरी दोन्ही बाजारापर्यंत प्रभावी ढंगाने पोहचते. पतंजलीने आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि प्राचीन भारतीय वारशाला प्रोत्साहन देत योग आणि आयुर्वेदला आपल्या ब्रँडची ओळख बनविण्यासाठी प्रयत्न केला आहे.

 

पतंजली आयुर्वेदचा जागतिक विस्तार

पतंजली आयुर्वेदने आपल्या ग्लोबल विस्तारामुळे प्राचीन भारतीय चिकीत्सा पद्धतीला जगभरात लोकप्रिय बनविले आहे.अमेरिका, यूरोप, आफ्रिका आणि आशियात आपली उत्पादनांची निर्यात वाढवून पतंजलीने आंतरराष्ट्रीय बाजारात स्वदेशी उत्पादनाच्या मागणीला मजबूत केले आहे. कंपनीने ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीचा उपयोग करुन आपल्या उत्पादनाची ग्लोबल उपलब्धता निश्चित केली आहे. याच बरोबर योग आणि आयुर्वेदिक संशोधन केंद्रांची स्थापनेद्वारे पतंजली ग्लोबल स्वास्थ प्रणालीत आयुर्वेदला एक प्रभावी चिकीत्सा पद्धतीच्या रुपात स्थापन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -