राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार उद्या गुरुवार ता. २७ रोजी इचलकरंजी शहरात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत.
उपमुख्यमंत्री नामदार पवार यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे सोबत दुपारी ठीक २.३० वाजता इचलकरंजी शहरात
आगमन होणार, तेथून ते थेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर.
कार्यालय राजाराम स्टेडियम येथे
उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून आढावा घेणार आहेत. तसेच याच ठिकाणी शहर व परिसरातील विविध संघटना तसेच वैयक्तिक नागरिक जे त्यांना निवेदन देणार आहेत त्यांचा स्वीकार करून त्याबाबत चर्चा करणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी तसेच निवेदन देण्यासाठी विविध संघटना यांचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन विठ्ठल चोपडे यांनी केले आहे.