Wednesday, July 23, 2025
Homeनोकरी10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; अग्निवीर भरतीला सुरुवात

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; अग्निवीर भरतीला सुरुवात

१० वी पास उमेदवारांना देशसेवेची संधी आहे. इंडियन आर्मीमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नीवीर भरतीला सुरुवात झाली आहे. ११ मार्चपासून या भरतीसाठी अर्ज सुरु झाले असून १० एप्रिल २०२५ हि अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. म्हणजेच आता फॉर्म भरण्यासाठी फक्त १० दिवसांचा वेळ बाकी आहे. १७ ते २१ वर्षे वयाचे उमेदवार अग्निवीर योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात.

 

कोणकोणत्या पदांची भरती – Agniveer Bharti 2025

अग्निवीर योजनेअंतर्गत अग्निवीर जीडी, टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला पोलिस या पदांसाठी भरती केली जाईल. याशिवाय, हवालदार (सर्वेक्षक), हवालदार (शिक्षण), जेसीओ (धार्मिक शिक्षक), जेसीओ (केटरिंग) आणि ऑटोमेटेड कार्टोग्राफर यांसारख्या पदांसाठीही भरती केली जाईल.

 

कसा आणि कुठे अर्ज भरावा-

अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची तुम्हाला आर्मी वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल. योग्य तपशील टाकून तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल.

 

वयोमर्यादा –

अग्निवीर भरती २०२५ (Agniveer Bharti 2025) साठी वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे. याच्यापेक्षा कमी जास्त वय असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. 1 ऑक्टोबर 2025 ही तारीख आधारभूत मानून किमान आणि कमाल वयोमर्यादा मोजली जाईल.

 

शैक्षणिक पात्रता –

जनरल ड्युटी पदांसाठी १०वी उत्तीर्ण आणि ट्रेड्समनसाठी ८वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

 

एका वेळी दोन पदांसाठी अर्ज करा

 

अग्निवीर भरतीसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे. यावेळी भरती प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उमेदवार एकाच वेळी दोन पदांसाठी अर्ज करू शकतात.

 

अग्नीवीर पदासाठी प्रवेश परीक्षा साधारणपणे जूनमध्ये घेतली जाईल. या संदर्भातील अंतिम तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. प्रवेश परीक्षा ही 13 भाषांमध्ये घेतली जाईल. यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी सह इतर भाषा असतील.

 

अग्नीवीर म्हणून काम सुरु केल्यास 48 लाख रुपयांचं विमा संरक्षण त्यांना दिलं जाईल. अग्नीवीर म्हणून काम करण्याचा कालावधी चार वर्षे आहे. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के अग्नीवीर भारतीय सैन्यदलात नियमित केडरमध्ये दाखल होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -