Tuesday, April 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : दोघांवर गुन्हा

कोल्हापूर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : दोघांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम


अल्पवयीन शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढ़न तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, मोबाईलवर तिचे अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश पाटील (रा. मोरेवाडी) व निलेश बोरपाळकर (रा.मंगळवार पेठ) या दोघा संशयितांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री उशिरा गणेश पाटील याला अटक करण्यात आली. शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात नामवंत असलेल्या एका खासगी शाळेत पिडीत मुलगी शिक्षण घेते. काही महिन्यापासून संशयीत निलेश याने तिच्याशी सोशल मिडीयावरून संपर्क साधला. प्रेमाचे संबंध ठेवण्याची त्याने मागणी केली. तिने ती फेटाळून लावली. याचा राग मनात धरून त्याने आपला मित्र गणेश पाटील याला तिचा मोबाईल नंबर दिला. गणेशने सोशल मिडीयावरून तिच्याशी संपर्क वाढवला.

शाळेच्या आवारात तो जाऊन थांबू लागला. तिच्याशी ओळख वाढवली. काही काही दिवसाने पिडीत मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर आपण लग्न करूया असे सांगून गणेश पाटीलने तिला आपल्या मोपेडवरून शहरातील एका कॉफी सेंटरमध्ये नेऊन तिचा विरोध असतानाही वारंवार अत्याचार केले. गणेशने पिडीत मुलीचे अश्लील फोटो काढले होते. मुलीने त्याला भेटणे टाळल्यानंतर त्याने मुलीचे फोटो गल्लीतील मुलांना ,पालकांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. दोघा युवकांनी आपल्या । मैत्रीणीचा गैरफायदा घेऊन बदनामी । केली, या त्रासामुळे पिडीत मुलीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -