Monday, April 22, 2024
Homeसांगलीसांगलीमध्ये प्रियकराच्या मदतीने आईनेच केला मुलाचा खून

सांगलीमध्ये प्रियकराच्या मदतीने आईनेच केला मुलाचा खून

आपली पत्नी व तिच्या प्रियकराने त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून आपलाच साडेतीन वर्षांचा मुलगा मनन सुशांत वाजे (वय साडेतीन वर्षे) याचा खून केल्याची फिर्याद मृत मुलाचे वडील सुशांत सुधीर वाजे (वय 33, रा. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात दिली आहे.ही धक्कादायक घटना ऑगस्ट ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत मुंबई येथे घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील (रा.बिळाशी, ता. शिराळा, सध्या रा. मुंबई) व फिर्यादीची पत्नी प्राची सुशांत वाजे, (रा. वाळवा, सध्या रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. अमरसिंह याने प्राची हिला फूस लावून ऑगस्ट 2021 ते दि. 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मुलगा मनन याच्यासह मुंबई येथे आपल्या घरी नेऊन ठेवले होते.

तिथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा छळ सुरू केला होता. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून केला. अमरसिंह याने मनन याचा मृतदेह त्याच्या फॉर्च्युनर गाडीतून (एम.एच.13 एडी- 8080) बिळाशी (ता. शिराळा) येथे नेला. मनन याच्या मृत्यूबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मला दिली नाही.

वाकुर्डे गावात मनन याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मनन हा मुंबई येथे मृत झाला असताना संशयितांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र दाखल करुन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. या घटनेबाबत मला निनावी पत्र आल्याने मी संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर संशयित पत्नी प्राची व तिचा प्रियकर अमरसिंह यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी आष्टा पोलिसांनी संशयितांविरुद्ध बालकाचा खून करून त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


©

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -