Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रसोन्याचे भाव आणखी घसरले, खरेदी करणाऱ्यांना संधी, १० ग्रॅमचा दर पाहून होईल...

सोन्याचे भाव आणखी घसरले, खरेदी करणाऱ्यांना संधी, १० ग्रॅमचा दर पाहून होईल आनंद!

सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

 

तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

 

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत?(Gold-Silver Price On 8 April 2024)

 

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ८ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,६०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८०,३०० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ८९,३५० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ८८३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

 

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,१५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,४४० प्रति १० ग्रॅम आहे.

पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,१५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,४४० रुपये आहे.

नागपूर २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,४४० रुपये इतका आहे.

नाशिक २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,४४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

 

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -