Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात राडा; भर रस्त्यात दोन गटात तुफान हाणामारी अन् दगडफेक, व्हिडिओ व्हायरल 

कोल्हापुरात राडा; भर रस्त्यात दोन गटात तुफान हाणामारी अन् दगडफेक, व्हिडिओ व्हायरल 

कोल्हापूरच्या पन्हाळा मार्गावरील वाघबीळ येथे काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरुणांच्या जमावाकडून काहींवर दगडफेक करण्यात आली.

 

तर काहींना मारहाण करण्यात आली. काही तरुण दुकानांसमोर लावलेल्या गाड्या फोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हाणामारीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

कोल्हापुरातील पन्हाळा – रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटात तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. कोल्हापूर आणि जाफळे गावातील तरुणांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पन्हाळ्यातील एका खासगी महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. काठी आणि दगडफेक करत फ्रीस्टाईल हाणामारी झाली. तरुणांनी वाहनांवर हल्ला करत वाहनांचे नुकसान केले. कारण अद्याप अस्पष्ट आहे. पन्हाळा आणि कोडोली पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

 

नेमकं काय घडलं?

 

वाघबीळ परिसरात एक महाविद्यालय आहे. या परिसरात कॉलेजच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. वाघबीळ हा पन्हाळ्याला लागून असलेला घाट आहे. वाघबीळमध्ये काही पान टपऱ्या आणि चहाच्या गाड्या आहेत. दोन्ही गट चहाच्या गाड्यावर उभे असताना वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका जमावाने त्यांनी आणलेल्या गाड्या देखील फोडल्या.

 

सर्व तरुण रस्त्यावर हाणामारी करू लागले. मात्र, या हुल्लबाज तरुणांनी दगडफेक केली. हाणामारी केल्यानंतर दोन्ही गट परिसरातून पसार झाले. आता या घटनेनंतर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल. दोन्ही गटाच्या वादानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -