Wednesday, July 23, 2025
Homeब्रेकिंगगावातील महिलेशी प्रेमसंबंध, आईचा टोकाचा विरोध; प्रेयसीच्या सोबतीने त्याने जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे...

गावातील महिलेशी प्रेमसंबंध, आईचा टोकाचा विरोध; प्रेयसीच्या सोबतीने त्याने जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे संपवलं;

प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाने हत्या केल्याची घटना अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील सिन्नूर (sinnur) येथे घडली आहे. भिमाबाई हनुमंत कळसकोंडा असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात (Akkalkot South Police Station) रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण होते. त्या प्रेम प्रकरणाला आई भिमाबाई कळसकोंडा यांचा विरोध होता. रमेश कळसकोंडा आणि आई भिमाबाई यांच्यात या प्रकरणामुळे सतत वाद होत होते.

 

प्रेयसीच्या सोबतीने त्याने जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे संपवलं

त्यामुळेच प्रेयसी सोबत संगनमत करून रमेश कळसकोंडा याने गावाजवळील शेतात भिमाबाई कळसकोंडा यांचा त्यांच्यात साडीने गळा आवळून खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रमेश कळसकोंडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

एक्स्प्रेस खाली उडी घेत तरुणाची आत्महत्या

दरम्यान, टिटवाळा रेल्वे स्टेशनवर तरुणाने एक्स्प्रेस खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय दरेकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणाने वडिलांच्या निधनाचा धक्का बसल्याने टिटवाळा स्टेशनवर एक्स्प्रेस खाली उडी मारत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -