Friday, July 4, 2025
Homeब्रेकिंग5 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; परमेश्वर जाधवांना रंगेहाथ अटक

5 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; परमेश्वर जाधवांना रंगेहाथ अटक

राज्यात गेल्या काही दिवसांत एसीबीच्या (ACB) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला वेग आला असून विविध जिल्ह्यात सरकारी अधिकारी, कर्मचारी जाळ्यात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरमध्ये एका शेतकऱ्याकडून 2 लाख रुपयांची लाच घेताना थेट तहसीलदार यांना अटक करण्यात आली होती. तर, आता, नवी मुंबई जिल्ह्यात 5 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाच (Bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ग्रामसेवकाला ताब्यात घेतलं.

 

ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव यांनी घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. पेण तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून एसीबीने परमेश्वर यांस रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्यावरील कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही दोन महसूल कर्मचाऱ्यांविरुद्ध लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.

 

तहसीलदार लाच घेताना जाळ्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघेही लाच प्रकरणात अडकले होते. फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरूमाचे उत्खनन केले होते. मात्र, हे उत्खनन अनधिकृत असल्याचे सांगत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण असून मिटविण्यासाठी लाच मागितली होती. संबंधित महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे 2 लाख 20 हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केली होती. लाच म्हणून ठरलेल्या या रकमेतील 1 लाख 20 हजार रुपये शेतकऱ्याने त्यांना देऊ केले होते. तर, उर्वरीत 1 लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता. त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने या लाचखोरीची एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -