Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगचॉकलेटचे आमिष दाखवत सोबत नेलं, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

चॉकलेटचे आमिष दाखवत सोबत नेलं, ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

कर्नाटकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली (chocolate)आहे. ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. बिहारमधील एका मजुराने या ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर आधी बलात्कार केला त्यानंतर तिची हत्या केली. कर्नाटकच्या हुबळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. चॉकलेट आणि खेळणी देण्याचे आमीष दाखवून आरोपीने या मुलीला सोबत घेऊन जात तिच्यासोबत हे भयानक कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. हा ३५ वर्षीय आरोपी एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हुबळी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपीचे नाव रितेश कुमार असून तो ३५ वर्षांचा होता. रितेश हा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होता. मजूरीचे काम करण्यासाठी तो कर्नाटकात आला होता. हुबळीमध्ये तो ३ महिन्यांपासून राहत होता. तो बांधकाम साइट्स आणि हॉटेल्समध्ये काम करत होता. रितेशने ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. पण पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांच्या तावडीतून आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचे एन्काऊंटर करण्यात आले.

 

ही घटना रविवारी हुबळीच्या विजयनगर भागामध्ये घडली. याठिकाणी एक ५ वर्षांची मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. आरोपी रितेशची नजर तिच्यावर पडली. त्याने (chocolate)चिमुकलीला चॉकलेटचे आमीष दाखवत तिला पकडले आणि तिचे अपहरण करून तिला नजीकच्या निर्जनस्थळी नेले. मुलगी जोरजोरात ओरडू आणि रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज इतका मोठा होता की स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण ते येईपर्यंत आरोपी रितेशने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी रितेश तिथून पळून गेला होता.

 

 

रितेशने मुलीचे अपरहण करण्यापासून तिच्यासोबत केलेले संपूर्ण दुष्कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. आरोपी रितेशविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासांमध्ये त्याला अटक केली. रितेशला पोलिसांनी अटक केली. पण पोलिसांच्या ताब्यातून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या टीमवर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी रितेशवर गोळ्या झाडल्या. रितेशच्या पाय आणि पाठीला गोळी लागली. रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

 

हुबळीचे पोलिस आयुक्त शशी कुमार यांनी सांगितले (chocolate)की, अटकेनंतर रितेशला त्याचे काही कागदपत्रे गोळा करण्यासाठी आणि त्याची ओळख पडताळण्यासाठी त्याच्या घरी आणण्यात आले होते. त्यावेळी रितेशने पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या टीमने रितेशला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण जेव्हा तो पळू लागला आणि थांबला नाही तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर दोन ते तीन राउंड फायरिंग केले. एक गोळी त्याच्या पायाला लागली आणि दुसरी त्याच्या पाठीला लागली. ज्यामुळे तो पळून जाऊ शकला नाही. रितेशला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -