सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर लिमिटेड (Sanofi Consumer Healthcare India) कंपनीने गुंतवणुकदारांना मालामाल करण्याची संधी दिली आहे. ही कंपनी 1 शेअरवर 55 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित झाली आहे. त्यामुळे अनेकांना कमाईची आयती संधी मिळाली आहे. या आठवड्यातच कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर करण्याचे जाहीर केले आहे. शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात मोठ्या तेजीचे सत्र आले आहे. त्यात कंपनीने लाभांशाची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी मिळाली आहे.
1 शेअरवर 55 रुपयांचा लाभांश
बीएसईला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका शेअरवर पात्र गुंतवणूकदारांना 55 रुपयांचा लाभांश देण्याचे जाहीर केले. या डिव्हिडंड देण्यासाठी कंपनीने 17 एप्रिल रोजी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. पात्र गुंतवणुकदारांना लाभांशचा लाभ घेण्यासाठी या कंपनीचे शेअर 16 एप्रिल पर्यंत खरेदी करावे लागणार आहे.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी
सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर लिमिटेडचा आयपीओ आला नाही. कंपनी सनोफी इंडियामधून वेगळी झाली. सनोफी इंडियाच्या संचालकांनी 10 मे 2023 रोजी विलगीकरणासाठी मंजूरी दिली. त्यानंतर बीएसई आणि एनएसईमध्ये 13 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीची नोंदणी झाली. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. अप्पर सर्किट लागताच या कंपनीचा शेअर बीएसईवर 4702.90 रुपयांवर पोहचला. त्यामुळे सगळेच हरखून गेले.
सध्या बीएसईमध्ये कंपनीचा शेअर आज 4851.15 रुपयांच्या स्तरावर आहे. यापूर्वी शुक्रवारी हा स्टॉक 4946.60 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता. सनोफी इंडिया कंझ्युमर लिमिटेडचा शेअरमध्ये गेल्या एका वर्षात 1.24 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर आता कंपनीने कंपनीने गुंतवणुकदारांना मालामाल करण्याची संधी दिली आहे. ही कंपनी 1 शेअरवर 55 रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट निश्चित झाली आहे. त्यामुळे अनेकांना कमाईची आयती संधी मिळाली आहे.