Tuesday, April 29, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : युवकावर चाकू हल्ला आहे

इचलकरंजी : युवकावर चाकू हल्ला आहे

पैशाची मागणी करत एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा जवाहरनगरमधील राजमाता जिजाऊ क्रिडांगण येथे घडली. याकुब बाबु नायकवडे (वय २२, रा. म्हसोबा गल्ली नं. २, जवाहरनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आसिफ सलीम मुजावर (वय २५, रा. म्हसोबा गल्ली नं. १) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, याकूब नायकवडे आणि त्याच्या मित्रांचे मोबाईल संशयित आसिफ मुजावर याने जबरदस्तीने काढून घेतले. आणि पैसे द्या, अन्यथा मोबाईल विकेन, अशी धमकी त्याने दिली. मोबाईल मागितल्यावर संशयित मुजावर याने शिवीगाळ करत मोपेडच्या डिगीतून चाकू काढून फिर्यादीच्या डाव्या मनगटावर दोन वेळा वार केला आणि त्याला जखमी केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -