Monday, October 2, 2023
Homeकोल्हापूरबालिंगे पुलानजीक उसाने भरलेली ट्रॉली पलटी, दीड तास वाहतूक ठप्प

बालिंगे पुलानजीक उसाने भरलेली ट्रॉली पलटी, दीड तास वाहतूक ठप्प

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगे येथील भोगावती पुलानजीक उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, डी. वाय. पाटील कारखान्याकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता. १२.१५ वाजण्याच्या सुमारास बालिंगे येथे भोगावती पुलानजीक हा ट्रॅक्टर आल्यावर ट्रॅक्टरवरील चालकांचा ताबा सुटल्याने उसाची ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली. यामुळे सुमारे दीड तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पलायन केले आहे. नागरिकांनी व तरुणांनी रस्त्यावरील ऊस व ट्रॅक्टर एका बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. पलटी झालेली ट्रॉली काढण्यात येत आहे. अजूनही या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र