Friday, July 26, 2024
Homeकोल्हापूरमानवी वस्तीतील वन्यप्राण्यांचा वावर; उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री सतेज पाटील

मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांचा वावर; उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करा : पालकमंत्री सतेज पाटील

वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरावरील उपाययोजनांचा प्रस्ताव वनविभागाने तात्काळ सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केल्या. कोल्हापूर शहर परिसरातील मानवी वस्तीत गव्याचा वावरल्याच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वन परीक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गव्याच्या हल्ल्यात जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे दुर्घटना घडू नये व मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. रान हत्तींसाठी कॉलर आयडी बसविण्याबाबत ओरिसा राज्याच्या वनविभागाकडून माहिती घ्यावी, अशा सूचना देवून अशा उपाययोजनांमुळे रानहत्ती व मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -