ताजी बातमी ऑनलाईन टीम
जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी बेकायदेशिररित्या जवळ बाळगेलेल्या चार गावठी बनावटीच्या बंदूका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आजरा तालुक्यातील धामणे गावात छापा टाकून जप्त केल्या . या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांनी या हत्यारांचा वापर कशासाठी केला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विजय दिनकर घोरपडे, बाबुराव विठ्ठल लोकरे, सुनिल आण्णाप्पा लोहार,कष्णा शिवराम धामणकर, संदीप पार्ट (रा. सर्व धामणे,ता. आजरा) अशी गुन्हे दाखल झालेल्याची नावे आहेत. धामणे गावातील बाबुराव लोकरे याने घरा जवळ असलेल्या गवताच्या गंजीत बंदूका लपवून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना समजली होती. त्यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या पथकाने तेथे छापा टाकून तीन बंदका जप्त केल्या. या बंदका सुनिल लोहारने तयार करून दिल्याचे तपासात उघड झाले. दोन जीवंत काडतुसे व चार बंदुका असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कोल्हापूर शिकारीसाठी विनापरवाना बंदुका वापरणाऱ्या चौघांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -