इचलकरंजीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास फक्त 40 मिनिटात त्याने थंडच केलं आणि लगेच गार गार झालं असं काही चित्र निर्माण झाल. होय मित्रांनो मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इचलकरंजीत पाऊस पडला…!
गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी सह परिसराला पावसापासून हुलकावणीच मिळत होती. काल सोमवार व आज मंगळवारी दिवसभर प्रचंड उष्णता परिसरात जाणवत होती. अंगाची अक्षरशः लाही लाही होत होती. याचा परिणाम वृद्ध नागरिक तसेच लहान मुलांवर खूप दिसून येत होता.
त्याचबरोबर शहरात आज मंगळवार बाजार. यामुळे बाजारात व्यापारी तसेच ग्राहक दाखल होते. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटला. काही विजा कडाडल्या. अन कधी मोठा तर कधी छोटा म्हणजे पावसाच्या सरी कमी जास्ती होत. अखेर गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस इचलकरंजीत पडला.
दरम्यान काही काळासाठी बाजारात व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तर इतर ठिकाणी सर्वांचीच त्रिधा तिरपीट उडाली.