Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रचुडा भरलेली नवविवाहिता सुन्न, लग्नानंतर काश्मिरला फिरायला गेलेल्या जोडप्यावर दहशवाद्यांचा हल्ला, नवऱ्यावर...

चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न, लग्नानंतर काश्मिरला फिरायला गेलेल्या जोडप्यावर दहशवाद्यांचा हल्ला, नवऱ्यावर गोळ्या झाडल्या!

जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) विदारक दृश्यं समोर आली आहेत. पर्यटक आणि स्थानिकांवर झालेल्या या गोळीबारात, लग्नानंतर जम्मूमध्ये फिरायला आलेल्या जोडप्यालाही टार्गेट करण्यात आलं. या गोळीबारात मयत झालेल्या पतीच्या शेजारी खिन्न मनाने बसलेली पत्नी पाहून उपस्थितांच्या काळजात धस्स झालं. या महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे.

 

पहलगाममध्ये पोलिसांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना आपला निशाणा बनवला. पर्यटकांची नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या वेळी एक नवविवाहित जोडपेदखील दहशतवाद्यांच्या हल्लातून सुटले नाही. या जोडप्यातील पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला आणि मग त्याला गोळ्या घालण्यात आल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. ही महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसली.

 

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : 27 हून अधिक जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ल्यामध्ये 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आकड्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

या दहशतवादी हल्ल्यातील जखमींमध्ये राजस्थानच्या पर्यटकांसह महाराष्ट्राच्याही काही पर्यटकांचा समावेश आहे. तसंच काही स्थानिक नागरिकही यात जखमी झाले आहेत. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. सुरक्षा दलाकडून शोधकार्य सुरू आहे. दहशतवादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याची माहिती आहे. या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात आहे. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळावर तैनात करण्यात आली आहे.

 

पुण्यातील दोघांची प्रकृती गंभीर

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलंय. एकूण जखमी पर्यटकांमध्ये चार महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -