Wednesday, July 2, 2025
Homeनोकरीबँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांवर भरती

बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांवर भरती

बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक संधी निर्मण झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांवर भरतीप्रक्रिया सुरु आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.

 

बँक ऑफ बडोदाच्या भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 146 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

 

सिनिअर रिलेशनशिप मॅनेज 101 पदं, टेरिटरी हेड 17 पदं, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (विमा आणि गुंतवणूक ) 18 पदं, प्रायव्हेट बँकर -रेसिडंट प्रायवेटची 3 पदं, ग्रुप हेड 4 पदं, उप संरक्षण बँकिंग सल्लागार 1 पद आणि प्रोजेक्ट हेड प्रायवेट बँकिंग 1 पद अशी एकूण 146 पदं भरली जाणार आहेत.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरायचा असल्यास खुला, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग, महिला उमेदवारांना 100 रुपये शुल्क द्यावं लागेल.

 

बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवरील करिअर्स टॅबमध्ये गेल्यानंतर करंट अपॉर्च्युनिटीजवर क्लिक करा. या ठिकाणी अर्ज आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करुन फी भरा. अर्ज दाखल केल्यानंतर प्रिंट आऊट काढा.

 

बँक ऑफ बडोदातील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. ही पदं कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -