शेअर ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे भरपूर नफा मिळवण्याचे अमिष दाखवून डॉ. दशावतार गोपालकृष्ण बडे (वय ५६, रा. जवाहरनगर) यांची ९३ लाख ३५ हजार रुपये फसवणुक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकास अटक केली.
सांगितले.
मोहन महादेव साहु (वय ३८, रा. देवळी
रोड, धुळे) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी डिसेंबर २०२४ मध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सायबर फसवणुकीतील गुन्हा उघडकीस येण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी
पो. नि. पाटील यांनी सांगितले, डॉ. दशावतार बड़े यांना अॅक्सीस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य मार्गदर्शक केरशी तावडिया आणि सहाय्यक राशी अरोरा यांनी कंपनीच्या गुंतवणुकीविषयी आकर्षक परताव्याचे आश्वासन दिले. डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांनी कंपनीत मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. १३ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत डॉ. बडे यांनी ९३ लाख ३५ हजार रुपये संबंधित खात्यांमध्ये भरले. मात्र, या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉट्सअँप ग्रुपच्या अॅडमिनसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात बडे यांच्याकडून घेतलेली रक्कम कानपूर येथील बँकेत ३८ लाख कोलकत्ता येथील बँकेत २७ लाख आणि आसाम मधील बँकेत २४ लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. सदर ट्रान्स्फर रकम ही मोहन साहू यांच्या खात्यावर जमा झाली असून ती रक्कम साहू यांनी काढून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार मोहन साहू यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील केरशी तावडिया, राशी अरोरा आणि कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरचा शोध सुरु असल्याचे पो. नि. पाटील यांनी सांगितले.
•