Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्र7550mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह Redmi Turbo 4 Pro लाँच; पहा संपूर्ण माहिती

7550mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह Redmi Turbo 4 Pro लाँच; पहा संपूर्ण माहिती

रेडमीने चीनमध्ये आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Redmi Turbo 4 Pro लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्ससह आला असून त्यात 16GB पर्यंत रॅम, 1TB पर्यंत स्टोरेज आणि 7550mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. याशिवाय हा फोन IP66, IP68 आणि IP69 प्रमाणपत्रांसह डस्ट आणि वॉटरप्रूफ रेटिंगसह येतो, जे याला अत्यंत टिकाऊ बनवतात. तर चला या दमदार फीचर्सच्या स्मार्टफोनबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

 

Redmi Turbo 4 Pro चे फीचर्स –

या स्मार्टफोनमध्ये 6.83 इंच आकाराची 1.5K OLED स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. स्क्रीनमध्ये 3200 निट्स पीक ब्राईटनेस असून Dolby Vision चा सपोर्ट दिला आहे. रेडमी टर्बो 4 प्रो मध्ये Qualcomm चा नवीनतम Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 4nm फॅब्रिकेशनवर आधारित आहे. यामध्ये HyperOS 2 (Android 15 बेस्ड) सॉफ्टवेअरचा समावेश आहे. बॅटरीसंदर्भात, Redmi Turbo 4 Pro मध्ये 7550mAh क्षमतेची बॅटरी असून ती 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच 22.5W रिव्हर्स चार्जिंगची सुविधा देखील दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC आणि USB Type-C पोर्टचा समावेश करण्यात आला आहे.

 

कॅमेरा –

कॅमेराच्या बाबतीत, या फोनमध्ये Sony LYT-600 सेंसरसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS आणि EIS तंत्रज्ञानासह येतो. यासोबत 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -