पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) संपूर्ण देशात चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे जम्मू आणि कश्मीरच्या पर्यटनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून, काश्मीरमधील पर्यटनास चालना देण्यासाठी विशेष योजना तयार केली आहे.
मनसेचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “दहशतवाद्यांचा हेतू काश्मीरच्या पर्यटनावर घाला घालण्याचा आहे. जर पर्यटक तिथे जाणं थांबवतील, तर तिथल्या स्थानिकांची उपजीविका धोक्यात येईल. बेरोजगारी वाढल्यास तरुण दहशतवादाकडे वळू शकतात, हेच दहशतवाद्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे.”
मनसेचे १०० कार्यकर्ते जम्मू-कश्मीरमध्ये पर्यटनासाठी रवाना होणार (Pahalgam Attack)
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने ठरवलं आहे की, पक्षाचे सुमारे १०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुढील महिन्यात जम्मू आणि कश्मीरला भेट देणार आहेत. हे कार्यकर्ते सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे तिथे प्रवास करून स्थानिक पर्यटनाला पाठिंबा देणार आहेत.
देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणतीही खास सुरक्षा न घेता, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे (Pahalgam Attack) काश्मीरमध्ये फिरणार आहोत. ज्या-ज्या भागात जाण्याची परवानगी आहे, तिथे जाऊन आमचे अनुभव इतरांना सांगणार आहोत, जेणेकरून इतर लोकांनाही तिथे जाण्याचा आत्मविश्वास मिळेल.”
विकासाला लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांचा निषेध (Pahalgam Attack)
“काश्मीरमध्ये अनेक स्थानिकांनी पर्यटनाच्या माध्यमातून स्वतःचं जीवन उभारलं आहे. एक ड्रायव्हर होता, ज्याने एक गाडी घेतली (Pahalgam Attack) आणि हळूहळू दोन केल्या. हल्लेखोरांना हेच खटकतं की तिथे विकास होतोय. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटन वाढलं, विकास वेगाने होऊ लागला, आणि त्यावरच हा हल्ला म्हणजे थेट विकासावर घाला आहे,” असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं.