Bajaj Chetak 3503 – देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर ‘बजाज चेतक’चा नवा व बजेट वेरिएंट ‘Chetak 3503’ भारतीय बाजारात सादर केला आहे. ‘Chetak 35’ या मालिकेतील हा सर्वात स्वस्त मॉडेल असून याची एक्स-शोरूम किंमत परवडण्याजोगी आहे. त्यामुळे ग्राहकांना दमदार स्कूटर खरेदी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. तर चला या स्कूटरचे फीचर्स अन किमतीबद्दल अधिक जाणून घेऊयात.
Bajaj Chetak 3503 चे फीचर्स –
चेतक 3503 मध्ये नवीन चेसिस असून त्यात 3.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो सिंगल चार्जमध्ये 155 किमीपर्यंतची रेंज देतो. टॉप स्पीड 63 किमी/ताशी असून यामध्ये इको अन स्पोर्ट्स असे दोन राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत. तसेच चार्जिंग वेळ 0 ते 80% साठी 3 तास 25 मिनिटे आहे. यामध्ये हायएंड वेरिएंटप्रमाणेच 35 लिटरची अंडर-सीट स्टोरेज देण्यात आली आहे. यासोबतच या वेरिएंटमध्ये सीक्वेन्शियल इंडिकेटर, डिस्क ब्रेक्स, आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देण्यात आलेले नाही. ड्रम ब्रेक्स, बेसिक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह कलर LCD डिस्प्ले या मॉडेलमध्ये देण्यात आला आहे.
रंग अन बुकिंग –
हि स्कूटर (Bajaj Chetak 3503) फुल मेटल बॉडीसह चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात निळ्या, काळ्या , पांढऱ्या आणि राखाडी रंगांचा समावेश होतो. बजाज ऑटोने चेतक 3503 साठी बुकिंग सुरू केली असून ग्राहक अधिकृत वेबसाइट किंवा डीलरशिपद्वारे बुकिंग करू शकतात. या स्कूटरची डिलिव्हरी मे 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.