Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगसरकारचा नवा नियम लागू, ‘हे’ केलं नाही तर रेशन कार्डाचे सर्व फायदे...

सरकारचा नवा नियम लागू, ‘हे’ केलं नाही तर रेशन कार्डाचे सर्व फायदे होतील बंद !

रेशन कार्डाचे फायदे आपल्या सर्वांना माहितीच आहेत. यामुळे दरमहा रेशन तर मिळतंच, पण त्याशिवाय इतरही अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण अलीकडे राष्ट्रीय अन्न व रसद विभागाने रेशन कार्डाची ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. नाहीतर रेशन कार्डाचे सर्व फायदे बंद होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया कशी करायची, ती का गरजेची आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सविस्तर जाणून घेऊया.

 

रेशन कार्डाची केवायसी म्हणजे काय?

 

रेशन कार्डाची केवायसी म्हणजे ‘नो युवर कस्टमर’ (Know Your Customer). ही भारत सरकारची एक योजना आहे. याचा उद्देश रेशन कार्ड धारकांची ओळख पडताळणं आणि बनावट रेशन कार्डांना आळा घालणं आहे. या प्रक्रियेमुळे फक्त पात्र व्यक्तींनाच सरकारी योजनांचा लाभ मिळेल, असं सरकारचं ध्येय आहे.

 

रेशन कार्डाची केवायसी का गरजेची आहे?

 

पात्रतेची खात्री: केवायसीमुळे फक्त पात्र लोकांनाच रेशनची सबसिडी मिळेल आणि बनावट रेशन कार्डांचा वापर थांबेल. कार्यक्षम वितरण: केवायसी डेटाच्या आधारे सरकार सबसिडीचं वितरण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि ती खऱ्या गरजूंना मिळतेय का, हे तपासू शकेल. ऑनलाइन सुधारणा: केवायसीमुळे रेशन कार्डाच्या सेवा ऑनलाइन आणि पारदर्शी होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल. याशिवाय, ही प्रक्रिया भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठीही महत्त्वाची आहे, कारण अनेकदा बनावट कागदपत्रांद्वारे सबसिडीचा गैरवापर होतो.

 

रेशन कार्ड केवायसीचे फायदे

 

केवायसी पूर्ण केलेल्या रेशन कार्ड धारकांनाच सरकारी सबसिडी मिळेल. ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी आणि रेशन कार्डाशी संबंधित सुविधा सहज मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. बनावट रेशन कार्डांचा वापर आणि सबसिडीचा दुरुपयोग थांबवण्यात ही प्रक्रिया मदत करेल.

 

रेशन कार्डाची केवायसी कशी करायची?

 

रेशन कार्डाची केवायसी करण्याचे दोन पर्याय आहेत. एक ऑनलाइन आणि ऑफलाइन. दोन्ही पद्धती सोप्या आहेत, पण त्यासाठी काही कागदपत्रं तयार ठेवावी लागतील.

 

ऑनलाइन केवायसी कशी करावी ?

 

1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलवर (https://nfsa.gov.in/) जा. 2. ‘KYC’ टॅबवर क्लिक करा. 3. तुमचा रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. 4. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. 5. ‘सबमिट’ बटण दाबा आणि तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.

 

ऑफलाइन केवायसी कशी करावी

 

1. जवळच्या रेशन दुकानात जा. 2. केवायसी अर्ज भरून द्या. 3. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा करा. 4. अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.

 

या साठी आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत

 

1. रेशन कार्ड 2. आधार कार्ड 3. पॅन कार्ड (पर्यायी) 4. मतदार ओळखपत्र (पर्यायी) 5. पासपोर्ट (पर्यायी) 6. बँक पासबुक

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -