जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेतली.भारतात शॉर्टटम व्हीसावर राहणाऱ्या पाकिस्तानींना त्यांच्या देशात पाठविण्याचे काम सुरु आहे. तरी लाँग टर्म व्हीसावर करडी नजर ठेवली जात आहे. या कारवाईत उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पोलिस पाकिस्तानींना शोधण्याच्या मागे लागले आहे.
पोलिस तपासात असे पुढे आले की मुरादाबादमध्ये १०-२० नव्हे तर ५०० पाकिस्तानी राहात आहेत. वास्तविक साल १९५० मध्ये २२ महिलांचे विवाह भारतात झाले. या महिलांची आता कुटुंबे तयार झाली आहेत. केवळ महिलांची कुटुंबे झालीत तर असे नव्हे त्यांच्या मुलांचीही आता कुटुंबे झाली आहेत. त्यामुळे आता मुरादाबाद येथील पाकिस्तानींची संख्या ५०० झाली आहे.
५०० पाकिस्तानी
ज्या २२ महिलांची भारतात लग्न झाले आहे. हे तेव्हापासूनच भारतात लाँग टर्म व्हीसावर राहात आहे. त्यांना ९५ मुले झाली आणि या मुलांची देखील आता स्वतंत्र कुटुंब वाढली आहेत. त्यामुळे मुरादाबाद येथे पाकिस्तानीची संख्या एकूण ५०० झाली आहे.या पोलिस या सर्वांचा तपास सुरु आहे. एसपी रणविजय सिंह यांनी माहिती देताना सांगितले की मुरादाबादच्या सर्व ठिकाणांवर निगराणी सुरु झाली आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु झाली आहे.
कुटुंबाची संख्या वाढली
ज्या पाकिस्तानी महिलांच्या मुलांचीही मुले वाढली आहेत. ही कुटुंबं वाढत चालली आहे. या महिलांची लग्ने मुरादाबाद येथे राहणाऱ्या पुरुषांशी झाली आणि लग्नानंतर या महिला भारतात रहात आहेत. आता या सर्वांच्या कागदपत्राची तापसणी सुरु झाली आहे. आता या महिला आजी झाल्या आहेत. त्यांच्या नातवंड – पतवंड देखील जन्माला आली आहेत. त्यांची संख्या आता ५०० च्या आसपास झाली आहे.
भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज
या महिला जरी पाकिस्तानी असल्या तरी यांची मुलांना जन्मापासून भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. या महिलांकडे आधारकार्ड आणि रेशनकार्ड देखील आहे. या महिलांना भारतीय नागरिकत्व मिळांवं यासाठी अर्ज केला आहे. परंतू अनेक दशकांपासून त्यांना नागरिकत्व मिळालेले नाही.
पोलीस घेतायत शोध
22 पाकिस्तानी महिलांपैकी अनेक जणी आजी झालेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची संख्या ५०० च्या आसपास आहे. दशकांपूर्वी आलेल्या या महिलांना त्यांची पाकिस्तानी नागरिकत्व तसेच ठेवले असले तरी त्यांच्या मुलांचा जन्म येथे झाल्याने त्यांना आपोआप भारतीय नागरिकत्व मिळालेले आहे. त्यांच्याकडे आधारकार्ड आणि रेशनकार्ड असूनही त्यांना पाकिस्तानी नागरिकत्व त्याग केलेले नाही. मात्र त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केले आहे. त्या लाँगटर्म व्हीसावर आरामात राहात आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी नजर ठेवली असून त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसतील त्यांच्यावर गु्न्हा दाखल होऊ शकतो असे म्हटले जात आहे.