Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात - नवे सात रूग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात – नवे सात रूग्ण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ७ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर १४ जण कोरोनामुक्त झाले आहे, मात्र कोरोनामुळे मृत्यू संख्या शुन्य आहे.

शनिवारी दिवसभरात १११६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये आढळून आलेल्या ७ नव्या कोरोना बाधितामध्ये जयसिंगपूर नगरपालीका क्षेत्रातील १ जण तर कोल्हापूर महानगरपालीका क्षेत्रात ६ जणांचा समावेश आहे.

शनिवारी जिल्ह्यातील कोरोना सक्रीय रूग्णांची संख्या ६७ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ८९० पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १ हजार २४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ६७ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -