Saturday, December 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : अज्ञात वाहनांची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातात कॉलेज तरुणी आणि महिला...

कोल्हापूर : अज्ञात वाहनांची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातात कॉलेज तरुणी आणि महिला ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातात महाविद्यालयिन तरुणी व महिला ठार झाली. दोन्ही अपघातात अज्ञात वाहनांनी धडक दिली असून महिला व तरुणी आपापल्या वाहनांवर स्वार होत्या. गडमुडशिंगी व हुपरी येथे हे वेगवेगळे अपघात झाले.

या अपघातात आर्या संतोष पोतदार (वय 19,रा. हुपरी, ता. हातकणंगले) ही महाविद्यालयीन तरुणी व दीपाली महादेव माने (वय 32, रा. सुळकुड, ता. कागल) या महिला जागीच ठार झाल्या. या अपघाताची नोंद गांधीनगर व हुपरी पोलिसांत झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हुपरी आर्या पोतदार ही तरुणी कोल्हापुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

गेल्या कांही दिवसापासुन एस टी बस कर्मचा-यांचा संप सुरू असल्याने महाविद्यालयाला ती आपल्या मोपेड वरून जात होती. सायंकाळी गावी परत जात असताना तिच्या मोपेडला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसल्याने आर्या रस्त्यावरच कोसळली. तिला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला असता तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

या अपघाताची नोंद गांधीनगर पोलिसांत झाली आहे. तसेच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास यळगूड – हुपरी मार्गावरही अशाच पद्धतीने अज्ञात ट्रकची मोटारसायकलला क्र. MH12BK4048 जोराची धडक बसून झालेल्या अपघातात दिपाली महादेव माने या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. दवाखान्यासाठी दीपा या हुपरीला आल्या होत्या. गावाकडे परत जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना 12वर्षाचा मुलगा व 11 वर्षाची मुलगी आहे. या अपघाताची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -