पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील महाडिक पेट्रोल पंम्पासमोर मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाला असता एका वाहनास धडक देवून ट्रक सेवा रस्त्यावर पलटी झाला.
सुदैवाने सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने जिवीतहानी घडली नाही. दोन्ही वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
शिरोली पुलाची येथील महाडीक पेट्रोल पंम्पासमोर आज बुधवारी दुपारी दिड वाजण्यासुमारास पुणे चाकण येथून बेळगावकडे जात असलेल्या ट्रक ( क्र. एम एच २३ ऐ यु ५९०९) चा ब्रेक अचानक निकामी झाल्याने समोरील असलेल्या वाहनास धडक देवून ट्रक महामार्गावर संरक्षक लोखंडी बॅरिकेट तोडून १० फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळला.
दुपारची वेळ असल्याने सेवा रस्त्यावर रहदारी नव्हती. त्यामुळे मोठी जिवीतहानी किंवा अन्य कोणताही गंभीर प्रकार होण्यापासून वाचला. मात्र या अपघातानंतर बराच वेळ महामार्गावर व सेवा रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी आमदार अमल महाडिक यांनी भेट देवून अपघाताविषयी माहिती घेत ड्रायव्हरची विचारपुस केली. शिरोली पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.