Thursday, February 12, 2026
Homeमहाराष्ट्रअनुत्तीर्ण विद्यार्थ्याने घेतला वाढदिवशी गळफास

अनुत्तीर्ण विद्यार्थ्याने घेतला वाढदिवशी गळफास

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार 7 मे रोजी शहरातील निकाल जाहीर झाला. यात आमगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याला अपयश आल्यामुळे त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार 7 मे रोजी आमगाव शहरातील बजरंग चौक चौक येथे उघडकीस आली.

 

कृष्णा धरम शिवणकर (18) रा. आमगाव, बजरंग चौक असे मृताचे नाव आहे.

 

सोमवार 5 रोजी 12 वीचा निकाल जाहीर झाला. कृष्णा हा एमसीव्हीच्या अभ्यासक्रमाला होता. तो यात अनुत्तीर्ण झाला. निकाळ कळताच तो नैराश्यात होता. दरम्यान त्याने आज गळफास लावून आत्महत्या केली. उल्लेखनिय म्हणजे आज कृष्णाचा वाढदिवस होता. हाच त्याचा मृत्यू दिवस ठरला. कृष्णाच्या आत्महत्येने शिवणकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती आमगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कृष्धा फासावरील मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -