Saturday, January 17, 2026
Homeमहाराष्ट्रएकतर्फी प्रेमाच्या त्रासामुळे कीटकनाशक प्यायलेल्या तरुणीचा मृत्यू; पोलिसांच्या जबाबात गायत्रीनं काय सांगितलं?

एकतर्फी प्रेमाच्या त्रासामुळे कीटकनाशक प्यायलेल्या तरुणीचा मृत्यू; पोलिसांच्या जबाबात गायत्रीनं काय सांगितलं?

एकतर्फी प्रेमाच्या (One Sided love) त्रासाने कंटाळून कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा आज मृत्यू झाला. गायत्री ऊर्फ सानिका माणिक पोवार (वय १८, रा. वाघवे) असे तरुणीचे नाव आहे.

 

या प्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी आदित्य दिलीप पाटील (वय २१ रा. वाघवे, ता. पन्हाळा) याच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्यात आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम वाढविल्याची माहिती पोलिसांनी (Panhala Police) दिली.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी, वाघवे येथे राहणाऱ्या आदित्य पाटील याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो गायत्रीचा पाठलाग करून त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने ३० एप्रिलला कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 

तिच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आदित्य पाटील हा वारंवार लग्नाची मागणी करत होता; पण मला आई वडिलांचे संमतीशिवाय लग्न करायचे नाही असे त्याला सांगितले होते. तरीही तो मला त्रास देतच होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून मी कीटकनाशक घेतले असे नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -