भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जोरदार युद्धाला (India-Pakistan War) सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन हल्ला आणि मिसाईल डागण्यात येत आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकड्यांच्या प्रत्येक डाव भारत हाणून पाडत आहे, मात्र तरीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. पाकिस्तान अजूनही भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करत आहे तसेच Loc वर गोळीबार सुरु आहे. या एकूण परिस्थितीमुळे इंडियन प्रीमिअर लीग मधील कालचा पंजाबमधील सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता या एकूण युद्ध परिस्थितीमुळे IPL बंद होणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एक मोठे विधान केलं आहे.
देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे- India-Pakistan War
द इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India-Pakistan War) लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएल २०२५ बाबत आपले पर्याय खुले ठेवले आहेत. एकत्र हि स्पर्धा थांबवली जाऊ शकते किंवा स्पर्धेच्या वेळापत्रकात काही प्रमाणात सुधारणा करता येऊ शकते. अहवालानुसार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) म्हणाले, “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, सरकारशी चर्चा करत आहोत आणि उद्या आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेऊ. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. सरकार आम्हाला जे काही सांगेल ते करू. सध्या, आमची पहिली प्राथमिकता सर्व खेळाडूंची सुरक्षा हीच आहे असेही राजीव शुक्ला यांनी म्हंटल.
दरम्यान, काल किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कपिटल्स यांच्यातील धर्मशाळा येथील सामना (PBKS Vs DC) चालू स्थितीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका वरिष्ठ क्रिकेट अधिकाऱ्याच्या फोन कॉल नंतर सामना रद्द करण्यात आला. स्टेडियमचे लाईट टॉवर बंद करण्यात आले आणि मैदानातं अंधार करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर पडण्यास सांगितलं. तसेच दोन्ही संघांच्या खेळाडूंना ताबडतोब आपापल्या बसेसमध्ये चढून टीम हॉटेलमध्ये परतण्यास सांगण्यात आले. भारत आणि पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पुढील सामन्यांवरही संकट ओढावले आहे. IPL 2025 मध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंना लवकरात लवकर त्यांच्या घरी जायचे आहे. बीसीसीआय मात्र सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच ते आयपीएल संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकता.