इयत्ता 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यरभारत इयत्ता 10 विच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल येत्या 13 मे रोजी लागणार असल्याचे जाहीर केले आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी निकाल नेमका कुठे पाहावा? त्यासाठीची संकेतस्थळं कोणती? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
शिक्षण मंडळाने नेमकं काय सांगितलं?
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी निकाल नेमका कुठे पाहावा?
2. https://results.digilocker.gov.in
3. https://sscresult.mahahsscboard.in
4. http://sscresult.mkcl.org
वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळांवर क्लिक करून विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पहता येईल. आगामी शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना ही गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
विद्यार्थ्यांनी निकाल कसा पाहावा?
विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या संकेतस्थळांपैकी कोणत्याही संकेतस्थळावर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आपला आसनक्रमांक तसेच विचारण्यात आलेली इतर माहिती व्यवस्थित भरावी. ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दिसेल.