Wednesday, July 23, 2025
Homeमहाराष्ट्रनिशब्द.! लग्नाच्या चार दिवस आधीच नववधूचा मृत्यू; कुटुंबाच्या आनंदावर शोककळा; नेमकं काय...

निशब्द.! लग्नाच्या चार दिवस आधीच नववधूचा मृत्यू; कुटुंबाच्या आनंदावर शोककळा; नेमकं काय घडलं?

लग्नाची स्वप्नं पाहणाऱ्या २० वर्षीय नववधू सुषमा श्रीमंत जाधव हिचा लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिप्पळगाव येथील तिच्या राहत्या घरी घराच्या स्वच्छतेदरम्यान विद्युत शॉक लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

 

येणाऱ्या २० मे रोजी सुषमाचा विवाह येलदरा (ता. जळकोट) येथील सुनील सूर्यवंशी यांच्याशी होणार होता. घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. मंगळवारी दुपारी सुषमा घर साफ करत असताना कुलरची पिन लावत होती, त्याचवेळी तिला विद्युत प्रवाहाचा शॉक लागला.

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथील श्रीमंत जाधव व चंद्रकला जाधव हे शेतकरी कुटुंब ३ एकर शेतीवर उपजीविका भागवत होते व कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार मोठी मुलगी सुषमा (२०) वर्ष शिक्षणाला आई वडिलांनी मेहनत कबाड कष्ट करून शिकवले मुलगी बी.ए.सी झाली मुलीचे स्वप्न कांहीतरी मोठ्या पदावर काम करण्याची होती.

 

मुलीला योग्य वर मिळावा म्हणून, नात्यातीलच आत्याच्या मुलाला कंपनीत काम करणाऱ्या सुनील सूर्यवंशी (रा येलदरा, ता. जळकोट) यांच्याशी थाटामाटात लग्न लावून देण्याचे या दाम्पत्याने ठरवले होते. गॅज्युवेट मुलगी असल्यामुळे गेल्याच आठवड्यात दोघांचा साखरपुडा केला. २० मे लग्राची तारीख ठरली, परंतु मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान सुषमा पै, पाहुणे येत आहेत म्हणून घराची साफ सफाई करत होती. घर स्वच्छ धुऊन घेतले घराची फरशी ओली झाल्यामुळे फरशी कोरडी करण्यासाठी कुलरची पिन लावत असताना सुषमाचा हात लागला.

 

त्यामुळे विद्युत प्रवाहाचा शॉक लागला व त्यातच तिचा मृत्यू झाला. गावात मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली क्षणात साऱ्याच्या आनंदाच रूपांतर शोक कळेत झाल या दुदैवी घटनेमुळे जाधव व सूर्यवंशी या दोन्ही कुटुंबावर विरजण पडले. मंगळवारी सांयकाळी ५ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -