सांगली तून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. हत्येनंतर पतीने पोलीस ठाणे गाठत आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अनिता सीताराम काटकर (वय अंदाजे ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या भाजी विक्रीचा व्यवसाय करत होत्या, आणि त्यांच्यासोबत पतीही काम करत होता. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणादरम्यान पतीने पत्नीवर हात उगारला. तसेच मारहाणही केली. पतीच्या डोक्यात राग इतका शिरला की त्याने कुऱ्हाड घेतली आणि पत्नीच्या डोक्यात हाणली.
यात अनिताचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या तपासात कौटुंबिक वादातून महिलेची हत्या झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर महिलेच्या पतीने पोलिसांसमोर हत्येची कबूली दिली.
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केली असल्याचं त्याने सांगितलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.