Tuesday, July 1, 2025
Homeनोकरीमहाराष्ट्रात रोजगाराची सुवर्णसंधी ! एकाचवेळी 27 हजारांहून अधिक नोकऱ्या, 5127 कोटींची ऐतिहासिक...

महाराष्ट्रात रोजगाराची सुवर्णसंधी ! एकाचवेळी 27 हजारांहून अधिक नोकऱ्या, 5127 कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

महाराष्ट्रात औद्योगिक विकासाचा नवा अध्याय सुरू होतोय! नागपूर, चाकण, पनवेल, भिवंडी आणि सिन्नर या पाच प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमध्ये एकाच वेळी तब्बल 27,510 नोकऱ्यांच्या संधी उभ्या राहत आहेत. ही केवळ रोजगाराची बातमी नसून, राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीचा इतिहास घडवणारी 5127 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

 

ब्लॅकस्टोन समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारामुळे हा बदल शक्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार राज्यात 10 हून अधिक आधुनिक लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्स उभारले जाणार आहेत. या प्रकल्पांमुळे केवळ भौगोलिक विकासच नव्हे तर स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

या लॉजिस्टिक्स पार्क्सचं वैशिष्ट्य म्हणजे ते पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त आणि सस्टेनेबल रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारे असतील. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही गुंतवणूक महाराष्ट्राला भविष्यातील लॉजिस्टिक्स हब बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरेल.

 

एमसीएमसीआरमध्ये सरकारी नोकरीची संधी

दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेच्या एमसीएमसीआर (महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र) मध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्त्वावर असून, शैक्षणिक, तांत्रिक, प्रशासकीय आणि कार्यालयीन पदांसाठी 15 संवर्गांतून एकूण 20 पदांवर नियुक्त्या होणार आहेत.

 

कुठे कराल अर्ज ?

एमसीएमसीआर हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाचे प्रमुख केंद्र आहे. या केंद्राद्वारे महानगरपालिका तसेच इतर नागरी संस्थांच्या क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी संशोधन व सल्लागार सेवा पुरवली जाते.उमेदवार https://mcmcr.mcgm.gov.in/careers.php या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत.

 

 

एकीकडे उद्योगक्षेत्रात तब्बल 5127 कोटींची गुंतवणूक आणि दुसरीकडे महापालिकेत सरकारी भरतीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधींचं मोठं दालन उघडलं जात आहे. सरकारच्या या पावलांमुळे युवकांना स्थिर भविष्य आणि राज्याला बळकट अर्थव्यवस्था मिळणार हे निश्चित!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -