Wednesday, September 17, 2025
Homeमहाराष्ट्रकौटुंबिक वादातून पत्नीचा निर्घृण खून

कौटुंबिक वादातून पत्नीचा निर्घृण खून

संजयनगर परिसरात शिंदे मळा येथील कुरणे गल्लीत कौटुंबिक वादातून पतीने कुर्‍हाडीने सहा ते सात वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवार दि. 16 मे रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास घडली.

 

अनिता सीताराम काटकर (वय 60, रा. कुरणे गल्ली, शिंदे मळा, सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनानंतर संशयित पती सीताराम रामचंद्र काटकर (65) हा स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. संजयनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिता काटकर या पती सीताराम याच्यासोबत शिंदे मळा येथील कुरणे गल्लीत राहत होत्या. दोघे पती-पत्नी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होते. काटकर पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास अनिता काटकर या त्यांच्या घरातील बेडरूममध्ये झोपल्या होत्या. यावेळी संशयित पती सीताराम याने कुर्‍हाडीने त्यांच्या गळ्यावर, मानेवर आणि पाठीवर सहा ते सात वार केले. या हल्ल्यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. खुनाच्या घटनेनंतर संशयित पती स्वतःहून संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला.

 

घटनेची माहिती मिळताच शहर विभागाच्या उपअधीक्षक विमला एम., पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, खून करणारा संशयित पती सीताराम काटकर याला पोलिसांनी अटक केली असून, सततचा वाद, भांडणाच्या त्रासातून त्याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -