Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरपिसाळलेल्या कुत्र्याचा आठजणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा आठजणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याने माळवाडी भागातील येळापुरे गल्ली आणि बहुरूपी घागरीवाले वसाहतीमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील सहा बालकांचा आणि एका महिलेचा चावा घेतला. तसेच या कुत्र्याला मारताना एका युवकाचा चावा घेतला.

 

पिसाळलेल्या कुत्र्याने माळवाडी भागातील येळापुरे गल्ली आणि बहुरूपी घागरीवाले वसाहतीमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील सहा बालकांचा आणि एका महिलेचा चावा घेतला. तसेच या कुत्र्याला मारताना एका युवकाचा चावा घेतला.

 

त्यामुळे तो युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत माळवाडी भागात घडली.

 

शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने प्रथम शिरोली माळवाडी येथील काहीरा डांगे (वय 6) या बालकाला एकच्या सुमारास चावा घेतला. त्यानंतर पुन्हा या कुत्र्याने याच गल्लीतील आयन अल्ताफ खान ( वय 5) याचा चावा घेतला. त्यानंतर हे कुत्रे पुढे सावरकरनगर घागरी वाले वसाहतकडे गेले. त्या ठिकाणी आयतान गवंडी (वय 4), मारुती कोंडापल्ली (5), सलोनी कुमारी (4) शरण्या गोलकर (3) अंजुबाई कांबळे (60) यांचा चावा घेतला. या कुत्र्याला मारताना सर्जेराव शिंदे (वय 33) त्याच्या मांडीला चावा घेऊन गंभीर जखमी केले.

 

या कुत्र्याने शरण्या गोलकर या बालकाच्या चेहर्‍यावर तर अन्य बालकांच्या ओठावर, पाठीवर, मांडीवर चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. ही माहिती मिळताच शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक अभिजित शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन या बालकांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -