Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रशाळगाव येथील तरुण कोल्हापूर येथे अपघातात ठार, बाळूमामा दर्शनाला गेले अन् नेमकं...

शाळगाव येथील तरुण कोल्हापूर येथे अपघातात ठार, बाळूमामा दर्शनाला गेले अन् नेमकं काय घडलं?

जैताळ फाट्याजवळ ताबा सुटून दुचाकीने रस्त्याकडेच्या झाडाला धडक दिली. दुचाकीस्वार मोहन किसन राठोड (वय ३९, रा. शाळगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची बहीण अनिता अरविंद चव्हाण (वय ४०, रा.

 

गिरगाव, ता. करवीर) व मुलगी रेणुका मोहन राठोड (१५) गंभीर जखमी झाल्या. आदमापूर येथे दर्शन आटोपून घरी परतत असताना हा अपघात घडला. याची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात झाली.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मोहन राठोड हा मुलगी रेणुका हिला घेऊन कोल्हापुरात आला होता. गिरगाव येथे राहणारी बहीण अनिता यांना सोबत घेऊन सकाळी ते आदमापूर येथे बाळूमामा दर्शनाला गेले होते. दुपारी तिघे घरी परतत असताना जैताळ फाट्याजवळ मोहन यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्‍याकडेच्या कठड्याला धडक लागून दुचाकी एका झाडाला धडकली. यामध्ये मोहन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर अनिता व रेणुका यांनाही गंभीर दुखापत झाल्याने ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले.

 

मोहन यांच्या दुचाकीची धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तसेच मागे बसलेल्या दोघींच्याही डोक्याला, खांद्याला, पायाला इजा झाली. तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये आणण्यात आले. मात्र, मोहन यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अनिता यांना रात्री उशिरा खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -