Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रदोन शेळ्यांनी गिळले सोन्याचे दागिने, त्यानंतर मालकाने जे केलं.. ऐकून व्हाल चकीत

दोन शेळ्यांनी गिळले सोन्याचे दागिने, त्यानंतर मालकाने जे केलं.. ऐकून व्हाल चकीत

सांगलीच्या मिरज तालुक्यातील सोनी येथील दोन शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने गिळण्याचा प्रकार घडला. त्यानंतर गोंधळलेल्या मालकाला काय करावे सुचत नव्हते. शेवटी त्याने दोन्ही शेळ्यांवर शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटातील दागिने काढण्याचे ठरवले. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून शेळ्यांच्या पोटातून दागिने काढण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत जवळपास ४० हजार रुपये आहे.

 

नेमकं काय घडलं होतं?

 

मिरज तालुक्यातील सोनी येथे हा प्रकार घडला. एका शेतकऱ्याच्या मुलीने तिच्या कानातील दोन सोन्याचे कर्णवेल काढून एका ताटात ठेवले होते,ज्यामध्ये पाणी होतं. प्रकाश गाढवे यांच्या घरात असणाऱ्या दोन शेळ्यांनी ताटातील पाणी पीताना सदरचे सोन्याचे दागिने असणारे कर्णवेल गिळले.यानंतर गाढवे यांनी मिरजेतील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी शेळ्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन दोन ग्रॅमचे सोन्याचे कर्णवेल यशस्वीरीत्या बाहेर काढले आहेत. दोन्ही शेळ्यांची प्रकृती देखील उत्तम असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

 

डॉक्टरांनी दिली प्रतिक्रिया

 

मिरज तालुक्यातील डॉ. डोके यांनी दोन शेळ्यांवर शस्त्रक्रिया केली. ते म्हणाले, ‘दोन शेळ्यांनी सोन्याचे दागिने कर्णवेल गिळल्याचा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला होता. त्यानंतर त्याने त्या शेळ्या मिरजेच्या शासकिय पशुवैद्यकीय रुग्णालयात आणल्या. त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करुन कर्णवेल बाहेर काढण्यात आले आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -