Saturday, January 17, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी, कोल्हापूर परिसरात पाऊस

इचलकरंजी, कोल्हापूर परिसरात पाऊस

इचलकरंजी शहर परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये विक्रेत्यांसह ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर शहराला सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास आलेल्या जोरदार चळीवाने शहरात तासाभरात पाणीच पाणी करून टाकले, अचानक आलेल्या या वळीवाच्या पावसामुळे मात्र शहरवासियांचे जनजीवन विस्कळीत झाले.

 

वादळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि बीजांचा कडकडाट यामुळे ढगफुटीसदृष्य पावसामुळे शहरातील वाहतुक व्यवस्था पूर्णपण कोलमडून गेली. शहरात सखलच नव्हे तर रस्यावरही पाणी मावेना झाले होते, त्यातच सोसाटयाच्या वान्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी झाडे व झाडांच्या फांदया मोडून पडल्या होत्या. गेली तीन-चार दिवस कोल्हापूर शहरात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असून मंगळवारी सायंकाळी चारच्या आसपास मात्र ढगफुटीसारखा पाऊस झाला. अचानक आलेल्या सोसाटयाच्या वान्यासह जोराच्य पावसामुळे बाजारात गेलेल्या ग्राहकांची, दुकानदारांची तसेच कर्मचाऱ्यांची त्रेधात्री पटा उडाली, कार्यालये सुटण्याच्या सुमारास वळीव पाऊस + आल्याने तसेच रेनकोट बरोबर नसल्यामुळे स सर्वांची मात्र दैना उडाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -