घरफोडीत चोरलेल्या मोबाईलवरुन रात्री-अपरात्री फोन करून महिलांना त्रास देणाऱ्या स्वप्निल शामराव कुंभार (वय २९ रा. शाहूनगर) या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने गजाआड केले आहे. त्याच्याकडून १ लाख ३५३ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर परिसरातील फरांडे मळा येथील मिनाक्षी शैलेश कोपद यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास केला होता. या प्रकरणी कोपद यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचनेवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक तयार करून समांतर तपास चालू केला. त्यादरम्यान इचलकरंजी
तीन मोबाईलसह १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
येथे काही महिलांना एक इसम मोबाईलवरून रात्री अपरात्री संपर्क साधून त्रास देत असल्याची माहिती मिळाली. त्या क्रमांकाची माहिती घेतली असता सदरचा मोबाईल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबतची माहिती
घेवून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता सर्व महिलांना त्रास देणारी व्यक्ती एकच असून त्याचे नाव स्वप्निल कुंभार असलेचे निष्पन्न झाले. संशयित आरोपी स्वप्निल कुंभार हा तीनबती चौक परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सागर चौगले यांना गोपनीयरित्या मिळाली.
त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून आरोपी स्वप्निल कुंभार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीच्या मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेवून
सखोल तपास केला असता त्याने कबनूर येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे मणी मंगळसुत्र, रोख रक्कम, त्याचा मोबाईल व मोटरसायकल असा एकुण १ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. • कुंभार याने आतापर्यंत ३ मोबाईलची चोरी करून ते इचलकरंजी चंदूर मार्गावरील ओढ्यात टाकल्याचे सांगितले. ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कुंभार यास पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, तसेच पोलीस अमलदार सागर चौगले, प्रशांत कांबळे, बालाजी पाटील, महेश आंबी, विलास किरोळकर, संजय देसाई, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील विनायक बाबर यांनी केली.