भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 26 डिसेंबरपासून सुरू होणारी पहिली कसोटी प्रेक्षकांशिवाय खेळवली जाणार आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला असून सामन्याच्या तिकीटांची विक्री करणार नसल्याचेही बोर्डाने सांगितले आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौ-यात यजमान संघाविरुद्ध तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्कमध्ये हा सामना खेळला जाणार असून भारत पहिल्या कसोटीदरम्यान प्रेक्षकांचे स्टँड रिकामे दिसतील.
द. आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर द.आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी तिकीट न विकण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कोरोना गाईड लाईननुसार, सरकारने 2000 लोकांना प्रवेशाची परवानगी दिली आहे, परंतु दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पहिली कसोटी प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असोसिएशन आणि स्थानिक पदाधिकारी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.