Friday, January 16, 2026
Homeसांगलीमिरजेत तरुणाचा चाकूने भोसकून खून

मिरजेत तरुणाचा चाकूने भोसकून खून

मिरज औद्योगिक वसाहतीत शिवशक्तीनगर भागात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रकार मध्यरात्री घडला असून, या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सोमवारी सकाळी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मिरज ते कुपवाड औद्योगिक वसाहतीकडील रोडवर असलेल्या सह्याद्री स्टार्च प्रकल्पाच्या मागे शिवशक्तीनगर वसाहत आहे. या वसाहतीमध्ये मध्यरात्री श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय २९, रा. भोसे ता. मिरज) या तरुणावर अज्ञातांनी चाकूने वार केले.

 

या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तरुणाला चाकूने पोटात भोसकले असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.यामागील कारण अथवा संशयिताबाबत ठोस माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. त्याच्या मित्रांकडे काही माहिती मिळते का, याची चाचपणी पोलिसांकडून आज दिवसभर सुरू होती. दरम्यान, मृत तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्याची नोंद पोलीस दप्तरी असल्याची माहिती मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -