Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगबंगळुरुतील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, नक्की काय म्हटलं?

बंगळुरुतील दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया, नक्की काय म्हटलं?

बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर घरच्या स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी स्टेडियमबाहेर एकच गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. चाहत्यांनी स्टेडियमध्ये जाण्यासाठी गेटवर गर्दी केली होती. चाहत्यांना विनंती करुनही ते ऐकत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बंगळुरुतील या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावरुन हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय? जाणू घेऊयात.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट

“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकर बरं व्हावं अशी मी प्रार्थना करतो”, असं पीएमओ एक्स अकाउंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -